Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यात मान्सूनचं आगमन झालं असून यंदा मान्सूननं वेळेआधीच आगमन केलं आहे. या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगानं सुरू असल्यामुळे तो 25मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा 10 दिवस आधीच आहे. मात्र 27 मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील.

सध्याच्या अंदाजानुसार, 27 मे पासून राज्यातील हवामान हळू हळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढ देखील होईल. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे, आणि किमान 5 जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे किमान 5 जूनपर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची आणि मान्सूनच्या पावसाची शक्यता दिसत नाही. या दरम्यान देशातील इतर भागात सुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो.

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचे आवाहन

या वर्षी राज्यातील अनेक भागात दमदार मान्सून पूर्वीचा वादळी पाऊस पडला आहे. आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा करून अथवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्यानं कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोणत्या जिल्ह्याला, कोणता अलर्ट?

राज्यात आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, पुणे, बीड, हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पालघर, नाशिक वगळता उर्वरित महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मच्छिमारांना 27 मे 2025 पर्यंत पूर्व-मध्य आणि दक्षिण अरबी समुद्र आणि लगतच्या ईशान्य-अरबी समुद्र, लक्षद्वीप आणि कोमोरिन क्षेत्रात आणि केरळ, कर्नाटक आणि कोकण-गोवा किनाऱ्यालगत आणि बाहेरील भागात जाऊ नये असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

Maharashtra Breaking LIVE Updates: वेळेआधीच मान्सून राज्यात दाखल, अनेक जिल्ह्यात पावसाची कोसळधार, देश-विदेशातील महत्त्वाच्या घटना एका क्लिकवर...
May 26, 2025
0