Top 80 News : Superfast News : 8 AM : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha
आजपासून १२ वी बोर्डाची परीक्षा, एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थी परीक्षेला, यात ८ लाख १० हजार ३४८ मुलं, ६ लाख ९४ हजार ६५२ मुली, आणि ३७ तृतीयपंथींचा समावेश.
बुलढाणा जिल्ह्यात १०वी १२वा परीक्षांच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्र परिसरात जमावबंदी लागू, झेरॉक्स दुकानं परीक्षा कालावधीत सक्तीने बंद ठेवण्यात येणार, ३४ हजाराहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा.
ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपी आढळेल, त्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्यात येणार, महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाचा महत्वाचा निर्णय, गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यात 271 भरारी पथके .
परीक्षा केंद्रावर गैरप्रकार करणाऱ्यांना मदत करणाऱ्यांवर अजामीन पात्र गुन्हा दाखल केला जाणार, संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेराद्वारे निगराणी .
अमरावती जिल्ह्यातील १२६ केंद्रांवर आजपासून १२वी बोर्डाची परीक्षा, जिल्ह्यातील ३३ हजार ५६३ विद्यार्थी परीक्षेला, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कलम 144 लागू.
परीक्षा केंद्र असलेल्या भागात १०० मीटर अंतरावर सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळेंकडून आदेश लागू.

Top 80 News : Superfast News : 8 AM : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha
February 10, 2025
0