ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 09 February 2025

अखेर राजन साळवींच्या शिंदेच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला, १३ तारखेला कार्यकर्त्यांसह ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार, मात्र सामंत बंधूचा विरोध असल्याची चर्चा
माघी गणेशोत्सवाच्या मुंबईतील पीओपी मूर्तींच्या विसर्जनाला पालिकेची मनाई, हायकोर्टाच्या आदेशावर बोट ,मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मंडळ आणि मूर्तीकारांची मागणी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरचा पनवेलजवळचा एक्झिट मार्ग ६ महिने बंद राहणार...कळंबोली सर्कलच्या बांधकामामुळे एक्झिट राहणार बंद, प्रवाशांना पर्यायी मार्गाचा करावा लागणार वापर
शिवरायांनंतर आंबेडकरांबद्दल सोलापूरकरचा वादग्रस्त व्हीडिओ व्हायरल, मेंटल हॉस्पिटलला धाडा, रोहित पवारांचा संताप, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शऱद कोळींचीही आगपाखड, टीकेनंतर सोलापूरकरांचा माफीनामा
बाबा आमटेंच्या आनंदवन स्थापनेचं अमृतमहोत्सवी वर्ष, मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्योगमंत्री सामंतांच्या उपस्थितीत आनंदवनात मेळावा.. आनंदवनातील प्रस्तावित योजनांचं डिजिटल उद्घाटन
मुंबईत विमानतळावर कस्टम विभागाच्या कारवाईत तब्बल १३ कोटीचं ड्रग्ज जप्त, बँकॉकहून ड्रग्ज घेऊन येणाऱ्या चौघांना विमानतळावरच बेड्या, आज कोर्टात हजर करणार
दुसऱ्या वन डेत ४ गडी राखून भारताचा इंग्लंडवर शानदार विजय.. कर्णधार रोहित शर्माची धडाकेबाज सेंच्युरी..२-० ने मालिकाची खिशात

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 09 February 2025
February 09, 2025
0