<p>Zero Hour: विधानसभेत विरोधीपक्षनेता नाही, फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन पूर्ण</p> <p> ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री <a title="देवेंद्र फडणवीस" href="https://ift.tt/hdpPvJ1" data-type="interlinkingkeywords">देवेंद्र फडणवीस</a> यांना पत्र लिहलं आहे. बेळगाव-कारवारला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी या पत्राद्वारे केली आहे. शिवाय, बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला मेळावा घेण्यापासून रोखण्यात आल्यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांनी आजच्या अधिवेशनाच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय. आदित्य ठाकरेंनी पत्रात काय म्हटलंय? आदित्य ठाकरे यांनी पत्रात लिहिलं की, सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो. आजच सभागृहामध्ये प्रथेप्रमाणे आपला परिचय झालेला आहे. त्याबद्दल सर्व सदस्यांनी आपले अभिनंदन ही केलेले आहे. आपल्याला माहीत असल्याप्रमाणे बेळगाव आणि कारवारचा प्रश्न गंभीर होत आहे. या प्रश्नी मराठी माणसांना न्याय देणे किती गरजेचे आहे हे आपण जाणताच. बेळगाव कारवार प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे. मी आपणास कळकळीची विनंती करत आहे की बेळगाव कारवार प्रश्नी आपण मराठी माणसाला न्याव द्यावा. आपण सभागृहामध्ये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी बेळगांव कारवार हा केंद्रशासित प्रदेश करण्याचा ठराव घ्यावा आम्ही एक मताने या ठरावास पाठिंबा देऊ. बेळगाव केंद्रशासित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे लवकरात लवकर पाठवावा आणि बेळगाव केंद्रशासित करण्यासाठी प्रयत्न करावेत, ही विनंती.</p> <p> </p>
Zero Hour: विधानसभेत विरोधीपक्षनेता नाही, फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन पूर्ण
December 09, 2024
0
