ABP Majha Headlines : 11 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

बदलापूर घटनेपेक्षाही कल्याणमध्ये वासनांध हैवानानं ओलांडली क्रौर्याची सीमा, अल्पवयीन मुलीवर अत्याचारानंतर हत्या, आरोपीला फाशीच्या शिक्षेचं खासदार श्रीकांत शिंदेंचं आश्वासन

ओळख लपवण्यासाठी नराधम विशाल गवळीनं दाढी काढली, मात्र शेगावच्या सलूनमध्ये पोलिसांकडून बेड्या, मृतदेह लपवण्यासाठी मदत करणाऱ्या पत्नीलाही अटक

मंत्रालयात दालनांच्या नुतनीकरणावर उधळपट्टी सुरू, तिजोरीत खडखडाट असताना खर्च कशासाठी, सर्वसामान्यांचा सरकारला सवाल

भाजप कोअर कमिटी बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीबाबत रणनीती...मुंबई महापालिकेत १५० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार...तर नवीन वर्षात सदस्य नोंदणी अभियान...

मुंबईकरांचं पाणी महागण्याची चिन्हे, पाणीपुरवठ्याच्या खर्चात वाढ झाल्याने पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर, निवडणुकीच्या तोंडावर पाणीपट्टी वाढीचा निर्णय होणार का याची उत्सुकता

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातली चौथी कसोटी उद्यापासून मेलबर्नमध्ये, बॉक्सिंग डे कसोटीत कर्णधार रोहित शर्मा सलामीला येण्याची शक्यता

ABP Majha Headlines : 11 PM : 25 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
December 25, 2024
0
Tags