Type Here to Get Search Results !

Zero Hour ABP Majha: लोकसभेत महायुती-मविआत दोस्तीत कुस्ती? ते राज ठाकरे ;झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

<p>Zero Hour ABP Majha: लोकसभेत महायुती-मविआत दोस्तीत कुस्ती? ते राज ठाकरे ;झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच, राजकीय वातावरण तापू लागलंय.. उमेदवारीसाठी किंवा आपलं राजकीय अस्तित्व जपण्यासाठी, अनेकांनी दल बदलण्यास सुरूवात केलीय.. आणि याची सुरूवात झालीय मिलिंद देवरांच्या रुपात.. वडील स्वर्गीय मुरली देवरांपासून तब्बल पंचावन्न वर्ष काँग्रेसशी संबंध असलेल्या, देवरांनी काल काँग्रेसला हात दाखवत.. एकनाथ शिंदेंचा हात पकडला...असं का झालं? हा मतदार संघ तसा देवरांचा पण २००९ ला जिंकल्यावर २०१४ आणी २०१९ ह्या दोन्ही निवडणुकांमध्ये एकत्रित शिवसेनेच्या अरविंद सावंतांनी धोबीपछाड दिली. तरीही आपल्याला उमेदवारी मिळेल हि आशा ... पण ती मिळणार कशी? कारण देवरा ज्या काँग्रेसचे उमेदवार होते त्याच काँग्रेसबरोबर ठाकरे सेने आली आणि ठाकरे सेनेबरोबर आले ते म्हणजे अरविंद सावंत. आणि मिलिंद देवरांचं राजकीय भवित्यव्य या नवीन राजकीय समीकरणाच्या ढगाआड गेले. आता इथून उमेदवारी देऊ शकणारे म्हणजे शिव सेना ... आणि त्यामुळेच देवरांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय हे स्पष्टय &nbsp;साहजिकच काँग्रेस नाराज झाली ..... २०१९ पर्यंत राजकीय चित्र होते ... ४ पक्ष, २ बाजू --- कॉंन्ग्रेस्स-राष्ट्रवादी एकीकडे आणि शिवसेना - भाजप एकीकडे ... मात्र आज कधीही न बघितलेली परिस्थिती ... बाजू दोनच, पण पक्ष ६ .... आणि त्यामुळेच मिलिंद देवरा हे फक्त पहिली केस आहेत, अनेक मतदार संघात, सर्वच पक्षातील नेत्यांसमोर मिलिंद देवरांसारखाच पेच उभा झालाय ... तोच आपण आजच्या ह्या भागात पाहणार आहोत. पण देवरा गेले आणि कधीकाळी मुंबई काँग्रेसचे चहेते असणाऱ्या देवरांवर टीका होऊ लागली</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies