Type Here to Get Search Results !

SSC Result : दहावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता, 'एबीपी माझा'च्या एका क्लिकवर डाऊनलोड करा गुणपत्रिका 


Maharashtra SSC Result 2023 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून आज दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 2 मार्च ते 25 मार्च या दरम्यान झालेल्या या परीक्षेसाठी 15 लाख 77 हजार विद्यार्थी बसले होते. दहावीच्या विद्यार्थ्यांना हा निकाल एबीपी माझाच्या वेबसाईटवरही पाहायला मिळणार असून त्यासाठी MH10.ABPMajha.Com लिंकवर क्लिक करावं लागेल. निकाल जाहीर झाल्यानंतर या लिंकवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन, झटपट कोणत्याही अडथळ्याविना निकाल पाहता येणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांना निकाल डाऊनलोडही करता येणार आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत पार पडली. यंदा दहावीच्या परीक्षेला 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचं निदर्शनास आलं आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 नं कमी झाली आहे. 

Maharashtra SSC Result 2023 : एबीपी माझाच्या वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहण्यासाठी खालीली स्टेप्स फॉलो करा 

स्टेप 1 : सर्वात आधी एबीपी माझाच्या वेबसाईटवर लॉन ऑन करा.
स्टेप 2 : दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा.
स्टेप 3 : तुमच्यासमोर एक नवं पेज ओपन होईल, तिथे असलेल्या बॉक्समध्ये तुमचा सीट नंबर टाका.
स्टेप 4 : त्याखालच्या बॉक्समध्ये तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा (उदा. आईचं नाव SONALI असेल तर तुम्हाला SON लिहावं लागेल)
स्टेप 5 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 6 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies