Type Here to Get Search Results !

Sachin Vanje Family : Ajit Pawar Nanded मधील शहीद जवानाच्या कुटुंबीयांच्या भेटीला

Sachin Vanje Family : Ajit Pawar Nanded मधील शहीद जवानाच्या कुटुंबीयांच्या भेटीला

भारत-पाकिस्तान सीमारेषेवर सध्या तणावाचे वातावरण असून भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर बॉर्डरवर (Border) गोळीबार सुरू आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत भारतमातेच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या काही जवानांना वीरमरण प्राप्त झालं आहे. जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथील अपघातात वीरमरण प्राप्त झालेल्या नांदेडच्या (Nanded) सचिन वनंजे यांना वीरमरण आले. त्यानंतर, त्यांच्या मूळगावी शोकाकुल वातावरणात आणि ग्रामस्थांच्या मोठ्या गर्दीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधींसह हजारो नागरिक अंत्यविधीला उपस्थित होते. आपल्या आठ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सचिन वनंजे यांच्या पत्नीने शहीद पतीला अखेरचा निरोप दिला. ह्रदय पिळवटून टाकणारं हे दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले. आता, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. तसेच, सरकारला जे शक्य आहे, ते तुमच्या कुटुंबीयांसाठी करू, असे आश्वासनही दिले.

भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर 6 मे रोजी जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथे आठ फूट खोल दरीत वाहन कोसळल्याने त्यावेळी ड्युटीवर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील 29 वर्षीय सचिन वनंजे यांचा मृत्यू झाला होता. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर सचिन यांचं पार्थिव देगलूरला आणण्यात आलं. त्यावेळी पत्नी, भाऊ आणि आई वडिलांसह उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते.दरम्यान, आज अजित पवार यांनी भेट दिल्यानंतरही कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies