, पठाणकोट, जैसलमेर, पंजाबमधील होशियारपूरवर पाकिस्तानने ड्रोन हल्ला (Pakistan Attack On India) केला. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर या ठिकाणी ब्लॅकआऊट करण्यात आलं असून भारताची डिफेन्स सिस्टिम सक्रिय झाली आहे. भारताने पाकिस्तानचे सर्व ड्रोन पाडल्याची माहिती समोर आली आहे. जम्मूतील विमानतळ हे पाकिस्तानचे लक्ष्य होतं अशी माहिती समोर येत आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारताने लागोलाग उत्तर दिलं असून थेट इस्लामाबाद आणि लाहोरवर (India Attack On Lahor Islamabad) क्षेपणास्त्रांचा हल्ला केला आहे.

गुरुवारी रात्रीच्या वेळी भारताच्या हद्दीतील जम्मू शहरात पाकिस्तानच्या ड्रोनचा हल्ला सुरू झाला. त्यानंतर जम्मूमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले आणि सायरन वाजवून लोकांना सावध करण्यात आलं. त्यानंतर या प्रदेशाचा ताबा लष्कराने घेतला. दरम्यान, भारताची डिफेन्स सिस्टिम एस 400 सक्रिय झाली आणि त्या माध्यमातून भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोनला हवेतच लक्ष्य केलं.

भारताचा इस्लामाबाद आणि लाहोरवर हल्ला

पाकिस्तानच्या आगळीकतेला भारताने आता प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली असून पाकिस्तानवर हल्ला सुरू केला आहे. पाकिस्तानच्या भागात त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे.

Pakistan Drone Attack On Jammu : पाकिस्तानचा जम्मूत हल्ल्याचा प्रयत्न भारताने हाणून पाडला ABP Majha
May 08, 2025
0