राज्यभरात मॉक ड्रिल हे उद्या संध्याकाळी करण्याचे नियोजन

महाराष्ट्र मध्ये १० हजार स्वयंसेवक या मॉक ड्रिल मध्ये सहभागी होणार आहेत

पोलीस, मेडिकल स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ, अग्निशमन दल, एनसीसी कॅडेट जिल्हा स्तरावरील यंत्रणा या मॉक ड्रिल मध्ये सहभागी होणार

मुंबईत वॉर्ड वाईज मॉक ड्रिल होणार, मुंबईतील प्रत्येक वॉर्ड मध्ये स्वयंसेवक तयार, यंत्रणा तयार

पाकिस्तानी लष्कराचा मोठा ताफा भारतीय सीमेकडे, पाकिस्तानी पंजाबमधील चिचवटनी, साहिवाल, पट्टोकी भागात ताफा, व्हिडीओ व्हायरल.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सायबर वॉर सुरू. भारतीय संकेतस्थळांवरील हल्ल्याला 'सायबर कमांडर'चं उत्तर. पाकिस्तानातील महत्त्वाच्या संकेतस्थळांवर सायबर हल्ले. पाकिस्तानी वेबसाईटवर झळकले 'हिंदुस्तान जिंदाबाद'चे संदेश.

घाबरलेल्या पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरुच,
पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूरमधील नियंत्रण रेषेवर विनाकारण गोळीबार.

दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला, युद्धाचं सावट असल्याने जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या भागात बंकर बांधण्याचं काम सुरू.

भारताच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्रांमुळे पाकिस्तानात धडकी, भारताच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा मुकाबला पाकिस्तान कसा करणार? संसदेत तेहरीक ए इन्साफचे खासदार उमर अयूब यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

भारतीय नौदलाच्या विमानांनी अरबी समुद्रात घिरट्या घालायला सुरूवात केल्याचा पाकिस्तानी नौदलाचा दावा, दोन्ही देशांच्या नौदलाकडून आपापल्या सागरी सीमेवर युद्धाचा सराव.

पाकिस्तानी राजकारणी मौलाना फजलुर रहमान यांचं संसदेतून वॉकआउट, भारतासोबत युद्धजन्य परिस्थिती असताना कोणीही गंभीर नसल्याने ते सभेतून बाहेर पडले

घाबरलेल्या पाकिस्तानी नेत्यांची चिथावणीखोर बडबड सुरूच, भारत पाकिस्तानला अणुयुद्धाकडे ढकलतोय, पाकिस्तानी संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचं वक्तव्य

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 06 May 2025
May 06, 2025
0