मुंबई : भारताचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाम पर्यटकांच्या रक्ताच्या सड्याने लाल झाला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत 28 जण मृत्यूमुखी पडले असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. या हल्ल्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे गंभीर जखमी झाले. त्यांच्यासोबत असलेल्या असावरी जगदाळे या त्यांच्या मुलीने या हल्ल्याचा थरार पाहिला आहे. माझ्या डोळ्यासमोरच वडिलांना आणि काकांना गोळ्या घातल्या, त्यावेळी एकही सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी नव्हता असं असावरी जगदाळे म्हणाल्या. असावरी जगदाळे या हल्ल्यामध्ये जखमी झाल्या आहेत.

Asavari Jagdale : नेमकं काय सांगितलं असावरी जगदाळे यांनी?

आपल्या वडिलांना आणि काकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. त्या ठिकाणाहून आम्हाला पळून यावं लागलं.

पहलगामधील मिनी स्वित्झर्लंड अशी ओळख असलेलं ठिकाण हे पर्यटकांचे आकर्षण आहे. या ठिकाणाहून बर्फाने अच्छादलेले डोंगर असतात. आम्ही आणि आमच्यासोबत हजारो पर्यटक त्या ठिकाणी होते. त्यावेळी वरच्या भागातून अचानक फायरिगं सुरू झाली. पोलिसांच्या वेषात आलेल्या लोकांनी आम्हाला धमकवायला सुरुवात केली.

तुम्ही मोदींना डोक्यावर चढवून ठेवलंय. तुमच्यामुळे मोदी मोठे झालेत. तुम्ही आम्हाला बदनाम केलंय. तुमच्यामुळे आमच्या धर्माला बदनाम व्हावं लागत आहे. आम्ही कधी महिलांना मारतो का? मग तसं का बदनाम करता? असं दहशतवादी आम्हाला म्हणाले.

त्यांनी माझ्या वडिलांना पकडलं आणि मुस्लिम असाल तर अजान वाचा असं म्हणाले. त्यानंतर असं त्यांनी अनेक पुरुषांना तसं करायला लावलं आणि नंतर त्यांनी गोळ्या घातल्या.

या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक चेकपोस्टवर पोलिस होते. नाक्या-नाक्यावर पोलिस होते. पण ज्या ठिकाणी हा हल्ला झाला त्या ठिकाणी एकही सुरक्षा रक्षक नव्हता. आम्हाला ज्यावेळी सुरक्षेची गरज होती त्यावेळी आम्ही आमच्या घरातील लोकांना गोळ्या खाताना पाहिल्या. तुम्ही मुस्लिम नाही असं सांगत आमच्यावर गोळ्या झाडल्या.

हिंदू मुस्लिम वादामध्ये सामान्य लोकांना मात्र जीव गमवावा लागत आहे. काही वाईट लोकांमुळे चांगल्या लोकांना भोगावं लागत आहे.

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack : पुण्यातील पर्यटकांवर गोळीबार

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांवर देखील मोठं संकट ओढवलं आहे. यामध्ये पुण्यातील काही पर्यटकदेखील असल्याची माहिती समोर आली आहे. जगदाळे पती-पत्नी आणि गणबोटे दाम्पत्य, घोड्यावर बसलेले असताना नाव विचारून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत सांगितलं की, पुण्यातील दोन कुटुंबीय पहलगामला गेले होते. हल्ल्यात संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हे जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या कुटुंबांशी माझा संपर्क झाला आहे. या कुटुंबातील सगळ्या महिला सुरक्षित आहेत. लवकरच त्यांना परत आणण्याची व्यवस्था केली जात आहे.

पुण्याहून पहलगामला गेलेले पर्यटक

असावरी जगदाळे - महाराष्ट्र

प्रगती जगदाळे - महाराष्ट्र

संतोष जगदाळे - महाराष्ट्

कौस्तुभ गणबोटे - महाराष्ट्र

संगीता गणबोटे - पुणे

Pahalgam Terror Attack : तुम्ही मोदींना डोक्यावर चढवलंय असं म्हणत माझ्या डोळ्यासमोर वडिलांना, काकांना गोळ्या घातल्या; जखमी झालेल्या असावरी जगदाळेंनी काय सांगितलं?
April 22, 2025
0