मुंबई : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या दुर्लक्षामुळे एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. तिच्या पोटी जन्माला आलेल्या दोन्ही मुलींचा उपचार खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तसे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणारच असंही मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात शुक्रवारी झालेल्या प्रकाराची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. जन्माला आलेल्या दोन्ही मुली या एनआयसीयूत भरती आहेत. त्यांचा उपचाराचा खर्च जास्त असून तो कुटुंबाला न परवडणारा आहे. त्यामुळे तो खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले. आठव्याच महिन्यात बाळंतपण झाल्याने त्या दोन्ही मुलींना काही दिवस एनआयसीयूत ठेवावे लागणार आहे.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकारची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेत या चौकशी समितीत खालील सदस्य असतील,

1) उपसचिव श्रीमती यमुना जाधव,
2) सह कक्षप्रमुख तथा कक्ष अधिकारी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांचे प्रतिनिधी,
3) सर जे. जे. रुग्णालय समूह, मुंबईचे अधीक्षक हे सदस्य असतील तर
4) विधि व न्याय विभागाचे उपसचिव/अवर सचिव.

त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या धर्मादाय रुग्ण योजनेची सर्व धर्मादाय रुग्णालयांकडून प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रधान सचिव विधी व न्याय विभाग तसेच धर्मादाय आयुक्त यांना खालील प्रमाणे सूचना केल्या आहेत.

धर्मादाय रूग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व धर्मादाय रुग्णालयांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे 'धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची' मान्यता घ्यावी. याबाबत धर्मादाय रुग्णालयांना तत्काळ निर्देश देण्यात यावेत.

विधी व न्याय विभागामार्फत गठीत करण्यात आलेल्या तपासणी पथकामार्फत तपासणी अहवाल व समितीच्या शिफारशी सादर केल्या आहेत. त्या शिफारशींवर तत्काळ कार्यवाही करावी.

शासनामार्फत धर्मादाय रुग्णालयांमध्ये 186 धर्मादाय आरोग्य सेवकांच्या सेवा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर पदे तात्काळ भरण्यात यावीत.

निर्धन रुग्णनिधी (IPF) खात्याबाबतची अद्ययावत माहिती धर्मादाय रुग्णालयांकडून घेवून ती धर्मादाय आयुक्त यांच्या संकेतस्थळावर अद्ययावत करावी.

योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या रुणालयांवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कठोर कारवाई करावी.

ही बातमी वाचा:

<a href="https://ift.tt/rq9tBLH Thackeray : जात, धर्म न पाहता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील आरोपी डॉक्टरांवर कारवाई करा : आदित्य ठाकरे

Devendra Fadnavis : जन्माला आलेल्या दोन्ही मुलींचा उपचार खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
April 05, 2025
0
Tags