Type Here to Get Search Results !

पुण्यानंतर आता कल्याण डोंबिवलीत धक्कादायक घटना, पालिकेच्या रुग्णालयातच महिलेचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

Kalyan Dombivli Shakti Dham Hospital : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (Kalyan Dombivli Municipal Hospital) शक्ती धाम रुग्णालयामध्ये (Shakti Dham Hospital) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करण्यासाठी रुग्णालयात नातेवाईकांनी या महिलेला दाखल केले होते. आज दुपारी 3 वाजता ऑपरेशन करण्यासाठी शांतीदेवी मौर्या यांना डॉक्टरांनी भुलीचे इंजेक्शन दिले होते. त्यानंतर त्यांची तब्येत खालावली होती. परिस्थिती नाजूक झाल्यानंतर डॉक्टरांनी एका खासगी रुग्णालयामध्ये हलवण्यासाठी ॲम्बुलन्स मागवली होती. मात्र, खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाताना या महिलेचा रस्त्यात  मृत्यू झाला आहे.

रुग्णालयामध्ये आयसीयू सुविधा नसतानाही महिलांवर शस्त्रक्रिया

धक्कादायक बाब म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये आयसीयू सुविधा नसतानाही महिलांवर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. या शस्त्रक्रिया दरम्यान एखादी महिला सिरीयल झाली तर तिला खासगी रुग्णालयात दाखल केले जात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एक महिन्यापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये प्रसूती दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा महापालिकेच्या रुग्णालयात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पालिकेचा आरोग्य सेवा सक्षम करण्याचा दावा फोल

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त तथा अतिरिक्त आयुक्त  हर्षल गायकवाड यांच्या पत्नी एमडी पॅथॉलॉजी विभागात 48 तासात नियमांना डावलून भरती केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळी महिलांचे मृत्यू थांबण्यासाठी भरती केल्याचे वैद्यकीय अधिकारी दीपा शुक्ल यांनी सांगितले होते. पालिकेचा सावळा गोंधळ उघड झाला असून पालिकेचा आरोग्य सेवा सक्षम करण्याचा दावा फोल ठरला आहे.

पुण्यात नेमकं काय घडलं होतं?

पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. अखेर अडीच लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतलं नाही.परिणामी तिला इतर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास झाला. या महिलेचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. रुग्णालयात पत्नीला दाखल करून घेत नाहीत म्हणल्यावर दीनानाथ रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला. तरीही रुग्णालय प्रशासनाने त्यांचं ऐकलं नाही. परिणामी गर्भवती महिलेने दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला मात्र महिलेचा जीव गमावला. या घटनेबाबत आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/RvTpKH4 Bhise Case: तनिषा भिसे प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयच दोषी, तत्काळ दाखल करून न घेणे मोठी चूक; सरकारी समितीचा अहवाल आरोग्य विभागाला सादर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies