ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 21 February 2025

महिलांना बसच्या तिकीटदरात ५० टक्के सवलत दिल्यामुळं एसटी महामंडळाला रोज तीन कोटींचा फटका, परिवहन मंत्र्‍यांनीच बोलून दाखवलं वास्तव...यापुढं एसटीत सवलती देणार नाही अशीही घोषणा...

वोहरा समितीचा अहवाल केंद्रीय गृहखात्याच्या रेकॉर्डवरून गायब झाल्याचा संशय, अहवालात राजकीय नेते आणि अंडरवर्ल्ड यांच्या संबंधांवर भाष्य, माहिती उपलब्ध नसल्याचं धक्कादायक उत्तर, माझाची एक्स्लुझिव्ह माहिती

मनोज जरांगेंचा आज मस्साजोग दौरा, देशमुखांच्या कुटुंबीयांशी चर्चा करणार, मस्साजोग ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंची भेट

अंजली दमानियांनंतर भाजप आमदार सुरेश धसांकडून धनंजय मुंडेंवर आरोप...अधिकाऱ्यांची मागणी नसताना नॅनो युरिया, नॅनो डीेएपीच्या खरेदीचा प्रस्ताव...राजीनामा देण्याची मागणी...

आरोपांच्या भोवऱ्यात अडकलेल्या धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचं निदान...दोन मिनिटंही नीट बोलणं मुश्कील...ट्विट करत स्वत:च दिली माहिती...

आजपासून ९८ वे मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन... देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारही उपस्थित राहणार.

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 21 February 2025
February 20, 2025
0