Type Here to Get Search Results !

चीनमध्ये HPMV चा उद्रेक, महाराष्ट्राचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर; यंत्रणेसह नागरिकांना महत्त्वाच्या सूचना

Maharashtra Health Department on HMPV : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना सारख्या विषाणूचा उद्रेक पाहायला मिळतोय.  HMPV  म्हणजेच मानवी मेटान्यूमोव्हायरस चीनमध्ये वेगाने पसरत आहे. अनेक लोकांना याची लागण झाली असून चीनमधील रुग्णालयांमध्ये HMPV च्या रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे. स्मशानभूमीतही मृतदेह दफन करण्यासाठी लांबच लांब रांगा दिसत आहेत, पण चीन हे मानायला तयार नाही. सोशल मीडियावर फिरत असलेले वृत्त चीनने फेटाळले आहे. परदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी देखील चीन सुरक्षित असल्याचे बिजींगकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, याबाबत महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने राज्यातील यंत्रणेसह नागरिकांसाठी एक परिपत्रक काढले असून यातून महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याच्या आरोग्य मंडळाने (Maharashtra Health Department) जिल्हा रुग्णालयांना पत्र लिहलं असून यामध्ये HMPV माहिती दिली असून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

आरोग्य विभागाने लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय?

सध्या चीनमध्ये Human Metapneumovirus(HPMV) उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडमध्ये २००१ मध्ये आढळला. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे ज्यामुळे व श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास सर्दीसारख्या) कारणीभूत ठरते. हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळयाच्या सुरुवातीला उद्भवतो. या अनुषंगाने डीजीएचएस आणि संचालक, एन सी डी सी, दिल्ली यांनी दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी एक निवेदन प्रसिध्द केले आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तथापी खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

हे करा :

> जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.

> साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.

> ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.

> भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा

> संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या.

हे करू नये :

> हस्तांदोलन

> टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर

> आजारी लोकांशी जवळचा संपर्क

> डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.

> सार्वजनिक ठिकाणी थुंकणे

> डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे.

चीनमधून आलेल्या नवीन विषाणू Human Metapneumovirus (HMPV) अहवालांबाबत चिंतेचे कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भितीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही. तथापी या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक गतिमान करुन सर्दी-खोकला अर्थात आय एल आय/ सारी रुग्णांचे नियमित सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात यावेत.

HMPV Virus Update : चीनमध्ये HPMV चा उद्रेक, महाराष्ट्राचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

इतर महत्त्वाच्या बातम्या

<a href="https://ift.tt/mlKn2uJ Vikhe Patil : मोफत जेवणामुळे शिर्डीत अपराधी, मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल्सची गर्दी; भिकाऱ्यांच्या वक्तव्यावर सुजय विखे ठाम

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies