उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते येवल्यात शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण, मंत्री छगन भुजबळांच्या संकल्पनेतून साकारली शिवसृष्टी.

लाडक्या बहिणींना बोनस, नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच मिळणार, परळीत उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती.

बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रातील शिळफाटा इथं २१ किमी लांबीचा भारतातील पहिला भूमिगत, समुद्राखालील बोगदा. यात ठाणे खाडीतील सात किलोमीटरचा समुद्राखालील बोगद्याचाही समावेश.

धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी मिठागरच्या जमिनी देण्याच्या प्रस्तावाला मुलुंडकरांचा जोरदार विरोध, या प्रकल्पामुळे मुलुंड ते कांजूरमार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पुराची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचं मुलुंडकरांचं म्हणणं.

रायगड जिल्ह्यात मुसळधार पाईस, शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ, हातातोंडाशी आलेली भात शेती परतीच्या पावसात पुन्हा भिजली.

बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यात मुसळधार पाऊस, सोयाबीन, कापूस पिकांचं नुकसान.

अहमदनगर शहरासह परिसरात पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ.

Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या : 02 October 2024 : ABP Majha
October 02, 2024
0