Type Here to Get Search Results !

ABP Majha Headlines : 10 PM : 16 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

जीआरच्या आश्वासनानंतरही धनगरांचं उपोषण सुरू, दाखल्यासाठी सरकारला आठ दिवसांची मुदत, तर जीआऱच्या निर्णयाविरोधात सत्तेतील आदिवासी नेत्यांचा सूर

मनोज जरांगेंचं मध्यरात्रीपासून सहाव्यांदा आमरण उपोषण, यंदा शेवटची संधी म्हणत फडणवीसांना इशारा, तर भुजबळांवरही साधला निशाणा

राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचं बक्षीस देईन, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली, काँग्रेस नेत्यांकडून पोलिसांत तक्रार,गायकवाड विधानावर ठाम

शरद पवारांमुळे राज्याला जातीयवादाचा कॅन्सर, पडळकरांची पातळी सोडून टीका, तर शिंदेंच्या संजय शिरसाटांकडून ठाकरेंच्या सेनेसाठी अपशब्द, मविआकडून दोघांचाही समाचार

दिवाळीनंतर महाराष्ट्रात दोन टप्प्यात विधानसभेचा बार, अनौपचारिक गप्पांदरम्यान मुख्यमंत्र्यांची माहिती, तर महापालिकेच्या निवडणुका कधी? ठाकरेंच्या सेनेचा सवाल

महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपकडून परराज्यातील नेत्यांची फौज सज्ज, महाराष्ट्र पिंजून काढत हायकमांडला रिपोर्ट देणार

कोकणात विधानसभा निवडणुकीतही महायुतीत वादंग होण्याची शक्यता, नव्या MIDCच्या घोषणेवरून भाजपचे माजी आमदार बाळ माने यांचे उदय सामंतांवर गंभीर आरोप

राज्य सरकारची सर्व महामंडळं टप्प्याटप्प्यानं शिंदेंच्या शिवसेनेलाच, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही महामंडळ मिळणार नाही का, राजकीय वर्तुळात चर्चा

महाराष्ट्रात तीन नव्या वंदे भारत एक्स्प्रेसचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, पुणे-हुबळी, पुणे कोल्हापूर आणि नागपूर-सिकंदराबाद वंदे भारतमुळे प्रवाशांची मोठी सोय

अदानी पॉवर पुरवणार राज्य सरकारला वीज, प्रक्रियेनुसारच टेंडर, आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना अजित पवारांचं प्रत्युत्तर

निर्यात शुल्कात कपात करूनही कांद्याचा वांदा कायम, जेएनपीटीच्या सिस्टिमध्ये बदल न झाल्याने शेकडो ट्रक कांद्याची निर्यात रखडली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडूनही फडणवीसांच्या गणरायासह मुंबईच्या प्रसिद्ध मंडळातील बाप्पाचं दर्शन

गणपती विसर्जनासाठी मुंबईतल्या चौपाट्यांवर यंत्रणा सज्ज, पुणे, नाशिकसह प्रमुख शहरात कृत्रिम तलावांची सोय,

मुंबईतल्या अभिनेत्रीला छळणाऱ्या आंध्रातल्या तीन आयपीएस अधिकाऱ्याचं निलंबन, खोट्या प्रकरणात अटक करून छळ केल्याचा आरोप

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies