Amol Kolhe on Maratha Reservation : मराठा आरक्षणावर अमोल कोल्हेंचं संसदेत मोठं वक्तव्य, म्हणाले...

हेही वाचा :

मतांसाठी राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवू नका, मनोज जरांगे पाटलांचं फडणवीसांना आवाहन

Manoj Jarange Patil : ओबीसी (OBC) आणि मराठ्यांच्या (Maratha) मतांसाठी राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवू नका. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याची कायदा सुव्यवस्था सांभाळावी असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलं आहे. ते बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मतांच्या राजकारणासाठी राज्याची कायदा व्यवस्था बिघडवू नका

ओबीसीचे मते आणि मराठ्यांचे मते हे या सरकारला पाहिजेत म्हणून ओबीसी आंदोलन आमच्या बरोबरीने आणून बसवलं आहे. त्यानंतर रोज ज्या घडामोडी घडत आहेत त्यात पोलीस त्यांचं काम करतायेत. मात्र, केवळ मतांच्या राजकारणासाठी राज्याची कायदा व्यवस्था बिघडू देऊ नका असे आवाहन मनोज जरांगे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले.

मी समाजासाठी काम करतोय, समाजावर अन्याय होऊ नये

मी समाजासाठी काम करत आहे. मला सगळा समाज सारखा असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. माझ्या समाजावर अन्याय झाला न पाहिजे ही आमची भूमिका असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. आमच्या गोरगरिब मराठ्यांवर अन्याय करु नका, त्यांच्यावर गुन्हे दाखल करु नका असे आवाहन जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलं. आमचा संयम ढळू देऊ नका.

Amol Kolhe on Maratha Reservation : मराठा आरक्षणावर अमोल कोल्हेंचं संसदेत मोठं वक्तव्य, म्हणाले...
July 01, 2024
0
Tags