ABP Majha Headlines : 6:30 AM : 29 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

अर्थसंकल्प म्हणजे थापांचा महापूर आणि आश्वासनांची अतिवृष्टी, उद्धव ठाकरेंची टीका... तर भूलथापांचा नाही मायबापांचा अर्थसंकल्प, फडणवीसांचं प्रत्युत्तर...
निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना वीज बिल माफीची भेट, साडे सात हॉर्सपॉवरपर्यंतच्या ४६ लाख कृषी पंपांची वीज बिलं माफ...
मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत, ८ लाखांच्या आत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मुलींना लाभ, मेडिकल,इंजिनियरिंग,कृषी अभ्यासक्रम मोफत शिकता येणार..
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची घोषणा,२१ ते ६० वयोगटातल्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार, येत्या १ तारखेपासून अंमलबजावणी..
महाराष्ट्रात ड्रग्ज घेणारे, विकणारे कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा...संपूर्ण राज्यात बुलडोझर, जेसीबी लावून ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही...
संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज संध्याकाळी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार, तर तुकोबांच्या पालखीचा आज आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पहिला मुक्काम
जम्मू-काश्मीरात अमरनाथ यात्रेला सुरुवात, देशभरातून लाखो श्रद्धाळू अमरनाथ यात्रेसाठी दाखल.प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त तैनात

ABP Majha Headlines : 6:30 AM : 29 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
June 28, 2024
0