नरेंद्र मोदी ८ जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेणार,
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेला एक मंत्रीपद, शिंदेंच्या वाटेला एक राज्यमंत्री, एक मंत्रीपद येण्याची शक्यता, सूत्रांची माहिती

इंडिया आघाडी सत्तास्थापनेचा दावा करणार नाही, इंडिया आघाडी वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत, दिल्लीत इंडिया आघाडीची खलबतं

सरकारमधून मोकळं करा, लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पक्ष नेतृत्त्वाला
विनंती

देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेचं काम करावं, आगामी काळात फडणवीसांच्या नेतृत्वात चांगलं यश मिळेल, फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर बावनकुळेंची प्रतिक्रिया

राज्यात पराभवाची जबाबदारी सामूहिक, फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया, शिंदेंची फडणवीसांशी फोनवरुन चर्चा

देवेंद्र फडणवीसांना जनतेनंच मुक्त केलंय, फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णयावरुन संजय राऊतांचा टोला, फडणवीस राज्याच्या राजकारणातले खलनायक असल्याची टीका

सर्वेंच्या नावाखाली लोकसभेच्या जागा बदलल्यामुळे फटका बसला... निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेची नाराजी..

बारामतीतल्या दारूण पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाराजी उघड, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची मतं मिळाली नसल्याचा अमोल मिटकरींचा आरोप

अजित पवार गटाच्या नाराज आमदारांचा सुळेंशी
संपर्क करण्याचा प्रयत्न..अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार परतीच्या वाटेवर, आमदार रोहित पवारांचा दावा

पुण्याचा कात्रज भागात दोन तासांत तब्बल ११३ मिमी पाऊस, तर कोल्हापुरातही जोरदार पावसाची हजेरी.. हलकर्णी ते बसर्गे रोडवरील ओढ्याला पूर आल्याची स्थिती

पुण्यातील तुपे कुटुंबाकडून विठ्ठल-रुक्मिणीला १५ लाख ९१ हजार रुपयांचा २५ तोळ्याचा सोन्याचा हार अर्पण...

६ जून रोजी किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा..छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं यंदा ३५१वं वर्ष..शिवराज्याभिषेकाची सोहळ्याची जय्यत तयारी सुरू

ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारताची विजयी सलामी.. आयर्लंडवर आठ विकेटसनी मात, कर्णधार रोहित शर्माची ५२ धावांची खेळी

ABP Majha Headlines : 10 PM : 05 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
June 05, 2024
0
Tags