पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी देण्यात आलेले पैसे पोलिसांकडून जप्त...घटकांबळेकडून ५० हजार, तर डॉ. हळनोरकडून अडीच लाख रुपये हस्तगत...

ब्लड सँपल बदलणाऱ्या ससूनमधील दोन्ही डॉक्टरांना ३० मेपर्यंत पोलीस कोठडी, स्विफ्टमधून तीन लाख रुपये आणणाऱ्या शिपायाला देखील अटक...

पुण्यातील एक्साईज डिपार्टमेंट कार्यालयावर रवींद्र धंगेकर, सुषमा अंधारेंचं आंदोलन...सुषमा अंधारेंनी वाचून दाखवले हप्तेबाजीचे रेटकार्ड...
((मविआ नेत्यांची एक्साईजवर 'धाड'))

पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी अजित पवारांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांना फोन केला होता का?, अंजली दमानियांचा सवाल...मी कधीच कुणाला सोडवण्यासाठी फोन केला नाही, अजित पवारांंचं उत्तर...

मोदी सरकार तीनचा शपथविधी १० जूनला होण्याचे अजित पवारांचे संकेत...शपथविधी कधी माहीत नाही पण मोदीच पंतप्रधान होणार, फडणवीसांना विश्वास...

आपल्या मतदारसंघात अल्पसंख्याक समाजात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, शरद पवारांचं नाव न घेता सुनील तटकरेंचा गंभीर आरोप...तर तटकरे गोंधळलेले आहेत, आव्हाडांचा पलटवार...

विधानपरिषदेत स्वतंत्र लढण्याची मनसेची भूमिका.. लोकसभेसाठी मोदींना पाठिंबा, विधानपरिषदेत मोदी नाही, मनसे नेते अभिजीत पानसेंचं वक्तव्य

विधानपरिषदेत स्वतंत्र लढण्याची मनसेची भूमिका.. लोकसभेसाठी मोदींना पाठिंबा, विधानपरिषदेत मोदी नाही, मनसे नेते अभिजीत पानसेंचं वक्तव्य

बीड जिल्ह्यात मराठा दुकानदाराकडून कोणतीही वस्तू विकत घेऊ नका, वंजारीबहुल गावातला संवाद कॅमेऱ्यात चित्रीत, ग्रामस्थ बबन घोळवेवर गुन्हा दाखल, जातीय एकोपा कायम राखा, एबीपी माझाचं आवाहन

ABP Majha Headlines : 11 PM : 27 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
May 27, 2024
0
Tags