पक्ष फुटले तेव्हा ते झोपले होते का?, ज्यांना आपला पक्ष सांभाळता आला नाही, ते देश काय सांभाळणार?.. एबीपी नेटवर्कला दिलेल्या एक्स्ल्युझिव्ह मुलाखतीत पंतप्रधान मोदींची ठाकरे आणि पवारांवर खरमरीत टीका..

घाटकोपरमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो.. महायुतीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी..तर मुंबईकरही मोठ्या संख्येने रस्त्यावर

मोदींच्या रोड शोला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर.. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अजित पवार देवगिरी निवासस्थानी..

७० हजार कोटींचा उपमुख्यमंत्री तर मुख्यमंत्री किती कोटींचा असेल?, नाशिकमधल्या सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

काश्मीरमधला लिथीयमचा साठा अदानींना मिळावा म्हणूून कलम ३७० हे काढलं.. नाशिकच्या सभेतून ठाकरेंचा मोदींवर नवा आरोप.. तर नकली संतानच्या टीकेवरुनही पलटवार..

कांदाप्रश्नी छगन भुजबळांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र.. कायमस्वरूपी उपाययोजना करा.. पंतप्रधांना कांद्याबाबत भुजबळांचं साकडं...

३१ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार.. हवामान विभागाचा अंदाज.. १९ मे रोजी दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता..

घाटकोपर अपघातातील मृतांचा आकडा १७ वर, बचावकार्य अजूनही सुरूच, घाटकोपरमधील अपघातग्रस्त पेट्रोलपंपही अनधिकृत असल्याची बाब उजेडात, महसूल खातं, पोलीस गृह मंडळानं नाकारली होती परवानगी

फेडरेशन कप २०२४मध्ये भालाफेकपटू नीरज चोप्राची बाजी.. डीपी मनूला पराभूत करत नीरज चोप्राने जिंकलं सुवर्णपदक

ABP Majha Headlines : 10 PM : 15 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
May 15, 2024
0
Tags