<p>Gajanan Kirtikar on Loksabha Election : लोकसभेच्या फाॅर्म्युलावरून महायुतीत मतभेद ? शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला चार गोष्टी सुनावल्या आहेत. त्यामुळं राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महायुतीचा लोकसभेसाठीचा फॉर्म्युला कुठून आला हे मला माहित नाही, पण जागावाटपाविषयी आमच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही, असं स्पष्टीकरण कीर्तिकरांनी दिलं आहे. शिवसेनेला १२ जागांचा फॉर्म्युला आम्हाला मान्य नाही. २०१९ साली आम्ही २२ जागा लढलो होतो आणि त्यात चार जागा हरलो होतो. मग आम्ही बारा जागा कशा घेणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, असंही वक्तव्य त्यांनी केलं.</p>
Gajanan Kirtikar on Loksabha Election : लोकसभेच्या फाॅर्म्युलावरून महायुतीत मतभेद ?
February 21, 2024
0
