Type Here to Get Search Results !

Nitesh Rane : तुमच्या मालकाचा मुलगा संत नाही, राऊतांनी बावनकुळेंचा फोटो शेअर केल्यानंतर नितेश राणेंची टीका

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (<a href="https://ift.tt/rWX1jEw Raut)) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (<a href="https://ift.tt/VfOrwS6 Bawankule) यांचा मकाऊ कॅसिनोमधील एक फोटो शेअर केला होता. त्यावरून आता राजकारण चांगलंच तापल्याचं दिसतंय. संजय राऊतांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. बावनकुळे यांच्यावर घाणेरडी टिप्पणी करता, तुमच्या मालकाचा मुलगा काही संत नाही अशा शब्दात नितेश राणे यांनी टीका केली.

आमदार नितेश राणे म्हणाले की, माणसाची हातभर फुटल्यानंतर काय अवस्था होते, हे संजय राऊत यांना पाहिल्यानंतर समजतं. मकाऊमध्ये जाऊन बावनकुळे यांनी काय चुकीचं केलं हे समजत नाही. बावनकुळे हे आपल्या कुटुंबासोबत गेले. कोण एन्जॉय करत असेल तर काय चुकीचं आहे? बावनकुळे स्वत:च्या कुटुंबा सोबत गेलेले. संजय राऊत बाहेर जाताना स्वतःचं कुटुंब घेऊन जातात का? यावर आपण पूर्ण एपिसोड करू शकतो. म्हणून एवढा थयथयाट करायची गरज नाही. बावनकुळे कुठेही चुकले नाहीत.

संजय राऊत चीनला कुणासोबत गेले?

संजय राऊत चीनला कोणासोबत गेले ते सांगू का? असं विचारत नितेश राणे म्हणाले की, तुम्ही मोदींवर बोलता, मग तुमच्या मालकाचा मुलगा दिनू मोरयाच्या मांडीवर बसून  कुठल्या हळदीचं दूध पीत होता. त्याचा ब्रँड सांगू का? संजय राऊत यांचा एका खासदार सोबत नाचताना व्हिडीओ त्यांच्या कुटुंबाने पाहिला तेव्हा घरात काय काय झालं हे त्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली जाईल.

नितेश राणे म्हणाले की, बावनकुळे स्वतःच्या कुटुंबासोबत गेले, ते स्पष्टीकरण द्यायची हिंमत ठेवतात, फोटो दाखवण्याची हिंमत ठेवतात. संजय राऊत यांनी स्वतःच्या कुटुंबासोबत गेल्याचे एक तरी फोटो दाखवावा. रशियन बहिणीसोबत काढलेला तो फोटो दाखवायचा का?. व्हिडीओ दाखवायची स्पर्धा करायची असल्यास मैदानात या. महाराष्टातील राजकारण किती खालच्या पातळीवर घेऊन जायचं या नागड्या माणसाला एकदा विचारायचं आहे. तुमच्या घरामध्ये तुमची किती किंमत आहे हे आम्हाला माहिती आहे.  संजय राऊत यांची माहिती जेव्हा द्यायला लागू तेव्हा त्यांच्या घरचे चपलाने मारतील.

तुमच्या मालकाचा मुलगा संत नाही

संजय राऊत यांच्यावर टीका करताना नितेश राणे म्हणाले की, तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावत घाणेरडे टिप्पणी कराल, मग तुमच्या मालकाचा मुलगा संत नाही. हा श्रावण बाळ नाही. दिशा सालियान, सुशांत सिंह राजपूत यांच्या मर्डर केसमध्ये यांचं नाव का येतं. रिया चतुर्वेदी सोबत आदित्य ठाकरे यांचे ड्रग्स चे चॅट आहेत की नाही याचे उत्तर त्यांनी द्याव. आदित्य ठाकरे हे दिनू मोरया याच्या घरी बसून कुठले कुठले वेब सिरीज बघायचा याची माहिती द्यावी लागेल. भाजपच्या कुठल्याही पक्षाच्या नेत्यावर खालच्या पातळीवर टीका केली तर तुमच्या पेक्षा कडवट सैनिक आहेत हे सांगावं लागेल. तुमच्या सारखे चायनीज मॉडेल नाही.

ही बातमी वाचा:

<a href="https://ift.tt/DF14XWf Raut : बावनकुळेंनी मकाऊ कॅसिनोमध्ये तीन तासात साडेतीन कोटी उधळले, माझ्याकडे 5 व्हिडीओ आणि 27 फोटो: संजय राऊत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies