Type Here to Get Search Results !
Pune : ससून रुग्णालयातील ड्रग्ज माफिया ललिल पाटील खरंच पळाला की त्याला पळवला? CCTV फुटेजमधून धक्कादायक माहिती समोर
<a href="https://ift.tt/s7JfUeI Hospital Drug Racket Pune : पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रॅग्स रॅकेट चालवणारा (Pune Crime News)  ड्रॅग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) हा पळून गेल्यानं खळबळ उडाली होती. मात्र या घटनेचा आता सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे आणि याच सीसीटीव्हीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळत नाही तर आरामात चालत निघून जातानाचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणात आता मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.
Sasoon Hospital CCTV : सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसत आहे?
ससून रुग्णालयाच्या गेट जवळ ललित पाटील पळून जाताना दिसत नाही तर ससून रुग्णालयाच्या आवारातून आणि मुख्य रस्त्यावरून शांतपणे चालत जाताना दिसतोय. त्यामुळे तो पोलिसांना हिसका देऊन पळून गेला या पोलिसांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.  त्याचबरोबर ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांची पळून जाण्यात त्याला मदत झालीय का? असाही प्रश्न विचारला जात आहे. काळी टोपी आणि मास्क घालून तो सगळ्या परिसराची पाहणी करत जाताना दिसत आहे. त्यामुळे तो पळाला की त्याला पळवला यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
दोनच दिवसांपूर्वी केली होती अटक
पोलिसांचं थेट निलंबन....
या प्रकरणानंतर पोलिसांच्या भूमिकेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. त्यामुळे पोलिसांनी धडाधड कारवाईला सुरुवात केली आहे. एकाच दिवशी थेट नऊ पोलिसांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं आहे. या प्रकरणी पीएसआय जनार्दन काळे, पोलीस हवालदार  विशाल ठोपले, स्वप्नील शिंदे,दिगंबर चंदनशिव, पीएसआय मोहिनी डोंगरे, हवालदार आदेश शिवणकर, नाईक, नाथाराम काळे, शिपाई पिरप्पा बनसोडे शिपाई आमित जाधव अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावं आहेत. मात्र सीसीटीव्हीत आरामात जात असल्याचं दिसत असल्याने या प्रकरणाची कसून चौकशी होणार आहे आणि ललित पाटीलला पकडण्यासाठी अनेक पथकं रवाना करण्यात आली आहे.
ही बातमी वाचा:
<a href="https://ift.tt/3xFJI0l Hospital Drug Racket Pune : ससून ड्रग्स प्रकरणात पुणे पोलीस अॅक्शन मोडवर; हलगर्जीपणा केल्यामुळे 9 पोलिसांचं तडकाफडकी निलंबन
Post a Comment
0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Top Post Ad
Below Post Ad
Hollywood Movies