Type Here to Get Search Results !

Gopichand Padalkar : पवारांची नजर ज्यावर पडली त्याची माती झाली, जो मराठा समाजाचा झाला नाही तो तुमचा कसा होणार? गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका

यवतमाळ: शरद पवार (Sharad Pawar) यांची नजर आणि सावली ज्या विषयावर पडली, त्याची माती झालेली आहे, जो मराठा समाजाचा झाला नाही, तो तुमचा कसा होईल असा घणाघात भाजप आमदार गोपीचंद पडळकर (<a href="https://ift.tt/2LrhDRQ Padalkar) यांनी केला. सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांना जवळचं दिसत नाही, कारण असे महाराष्ट्रच्या विरोधात काम करणारा घरातला माणूस ताईंना दिसत नाही अशीही टीका पडळकर यांनी केली.  यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे धनगर जागर यात्रेमध्ये ते बोलत होते.

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणासाठी राज्यभर धनगर जागर यात्रा सुरू केली आहे. अमरावतीमध्ये बोलताना ते म्हणाले की, आता तुम्ही जागा राहा. जर तुम्ही झोपला तर कायमचं झोपणार. एकबाजूने न्यायालयात लढू आणि दुसरीकडे रस्त्यावर लढू. म्हणून मी एकजूट करण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्यासाठी मी फिरतोय. शासनाने धनगर आरक्षणाचा जीआर काढावा ही मागणी आहे. 21 तारखेला जी कमिटी स्थापन केली ती लवकर इतर राज्यात पाठवा. इतर राज्यांनी जीआर कसे काढले याचा त्यांनी अभ्यास करावा.

अस्सल धनगर भाजपला मतदान करणार नाही, दिलीप ऐतडकर यांचे वक्तव्य

काँग्रेस प्रवक्ते तथा धनगर नेते दिलीप ऐडतकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, धनगरांच्या आरक्षणासाठी आम्ही सगळे सोबत आहोत. आम्ही कोणताही पक्ष म्हणून राहणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये सांगितले होते की, पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ. पण दिलं नाही. त्यामुळे पडळकर, तुम्ही आपल्या मित्रांना समजवावे. तुम्ही भाजपचा पान हलवू शकता. सरकारने जर आरक्षण दिलं नाही तर जो अस्सल धनगर असेल तो भाजपला मतदान करणार नाही.

धनगरी ताकद दाखवून देणार

येत्या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत न्यायालयाच्या माध्यमातून धनगरांना आरक्षण मिळेल अशी अपेक्षा आहे असं गोपीचंद पडळकर म्हणाले. ते म्हणाले की, जर न्यायालयाच्या माध्यमातून आरक्षण मिळाले नाही तर त्यासाठी प्लॅन बी म्हणून धनगर जागर यात्रा सुरू करणार. या यात्रेच्या माध्यमातून धनगरांना जागं करणार आणि धनगरी ताकद काय असते हे दाखवून देणार.

ही बातमी वाचा:

<a href="https://ift.tt/8d2gUiD Padalkar : तर धनगरी ताकद काय असते ते दाखवून देणार; आरक्षणाच्या प्रश्नी गोपीचंद पडळकर आक्रमक

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies