<p>Beed : Pankaja Munde आणि Devendra Fadnavis आज विनायक मेटेंच्या जयंतीच्या कार्यक्रमात एकत्र</p> <p>बीडमध्ये उपमुख्यममंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांचा आज जन्मदिन आहे. या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमासाठी फडणवीस आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर येणार आहे. विशेष म्हणजे सहा महिन्यांत फ़डणवीस तीन वेळा बीडमध्ये आलो होते आणि तिन्हीवेळा त्या कार्यक्रमांना पंकजा मुंडे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे यावेळी दोन्ही नेते एकत्र येणार का आणि आले तर ते काय बोलतील याची सर्वांना उत्सुकता आहे.</p>
