Type Here to Get Search Results !

धक्कादायक! बलात्काराच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीने पेटवून घेतले, प्रकृती चिंताजनक; बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातील घटना


Beed Crime News : रिक्षात विसरलेली पर्स वापस देण्याच्या बाहाण्याने एका महिलेवर रिक्षा चालकासह इतर सात जणांनी बलात्कार केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी माजलगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, यातील मुख्य आरोपीनं मंगळवारी रात्री 11.30 वाजता बीडच्या पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात माजलगाव पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी संदीप पिंपळे मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमरास पोलीस अधीक्षक कार्यालयात आला. तर माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असं म्हणत त्यानं अंगावर डिझेल ओतून घेतले. अंगावर डीझेल ओतल्यावर त्यानं स्वतःल पेटवून घेतलं. त्यामुळे नियंत्रण कक्षातील पोलिसांनी तत्काळ धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर पोलिसांनी संदीपला तत्काळ बाजूला असलेल्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. परंतु जास्त प्रमाणात भाजल्यानं त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण? 

गेल्या आठवड्यात माजलगाव पोलिसांत पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, 2014 मध्ये ती प्रवास करत असताना ती आपली पर्स संदीप पिंपळेच्या रिक्षात विसरली होती. दरम्यान पर्स परत देण्याच्या बहाण्याने पिंपळेने महिलेवर अत्याचार केला होता. तर अत्याचार करतानाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. पुढे हाच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेला ब्लॅकमेल करत सतत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याच्या नातेवाईक असणाऱ्या गोरख इंगोलेसोबत देखील पीडित महिलेला बळजबरीने संबंध ठेवण्यास भाग पाडले. तर गोरख इंगोलेनेही महिलेला ब्लॅकमेल करुन तिच्यावर सतत अत्याचार केला. 2015 साली गोरख इंगोलेचा भाऊ बालाजी इंगोले याने देखील महिलेस ब्लॅकमेल करुन तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे 2020 मध्ये गोरख इंगोले याने महिलेला एका घाटात नेऊन आपल्या इतर चार साथीदारांसोबत आळीपाळीने तब्बल 6 तास तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर  देखील नेहमी वारंवारचा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन न झाल्याने पीडितने माजलगाव शहर ठाणे गाठून गुन्हा दाखल केला होता. ज्यात संदीप पिंपळे मुख्य आरोपी होते. 

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies